पेशींचे कारखाने…

पेशींचे कारखाने…
रोगांवर मात करण्यासाठी आता लवकरच पेशींचे कारखाने उभे राहिले तर नवल नाही. पेंटॅगॉनचा पुढाकार असणारे हे संशोधन उपचार विज्ञानात क्रांतीच करणार आहे…
………………………..

जीवशास्त्राच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या वर्षात मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणारे अनेक क्रांतिकारी शोध लागण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. मानवी शरीरातील पेशीतील जीवरासायनिक प्रक्रियांवर नियंत्रण मिळवून या पेशींचे ‘जिवंत कारखाने’ बनविण्याचे संशोधन पेंटॅगॉन या अमेरिकन संरक्षण संस्थेद्वारा करण्यात येत असून या संशोधनाचे परिणाम या वर्षात समोर येण्याचे संकेत आहेत. या संशोधनातून मानवी शरीरातील पेशीतील रासायनिक प्रक्रियांवर नियंत्रण मिळविण्यात तसेच मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर या संशोधनात भर असून त्याद्वारे रोगांचा मुकाबला करण्यासाठी भक्कम संरक्षणयंत्रणा निर्माण करण्यासाठी हे क्रांतिकारी संशोधन ठरणार आहे.
पेंटॅगॉनतर्फे जीवशास्त्रविषयक संशोधनासाठी वेगळा विभाग केला असून या विभागाद्वारे पेशी अभियांत्रिकीविषयक संशोधनावर विशेष भर देण्यात येत आहे. येणाऱ्या काळात जीवशास्त्रविषयक संशोधनाला येणारे महत्त्व लक्षात घेता पेंटॅगॉनतर्फे जीवरसायनविषयक संशोधनावर विशेष भर देत जीवशास्त्रातील विशेष संशोधन हाती घेण्यात आले आहे.
पेशीद्वारे निर्माण होणाऱ्या अनेक रसायनांचा वापर वैद्यकीय उपचारासाठी करण्यात येतो. उदाहरणार्थ यीस्ट किंवा बॅक्टेरियासारख्या सूक्ष्मजीवांच्या पेशीत निर्माण होणाऱ्या अनेक घटकांचा वापर होतो. या सूक्ष्मजीवांद्वारे निर्माण होणाऱ्या रसायनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी या संशोधनात भर देण्यात येत असल्याचं पेंटॅगॉनच्या जीवशास्त्रविषयक संशोधन गटाचे प्रमुख डॉ. जस्टिन सँन्चेझ यांनी म्हटले आहे.
या संशोधनद्वारे पेशीद्वारे निर्माण करण्यात येणाऱ्या अनेक जीवनावश्यक घटकांवर नियंत्रण मिळविण्यात शास्त्रज्ञांनी यश मिळवलं आहे. या घटकांची निर्मिती करण्यास कारणीभूत असलेल्या जीवरासायनिक प्रक्रियांचं नियंत्रण करण्यात पेंटॅगॉन संशोधनगटाला यश आलं आहे. या तंत्रात रसायनं पेशीत निर्माण करण्यास कारणीभूत असणाऱ्या जनुकांवर नियंत्रण मिळविण्यात येतं. जनुकांवर नियंत्रण मिळवून पेशीत निर्माण होणाऱ्या रसायनांच्या निर्मितीसाठीची आज्ञावली निर्माण करण्यात ह्या संशोधन गटाला सफलता मिळाली आहे. यीस्टसारख्या कवकात जवळपास हजारांहून अधिक रासायनिक घटकांची निर्मिती करण्यात हा गट यशस्वी ठरला आहे. पेशीची जनुकीय आज्ञावली बदलून पेशीचं ‘री - प्रोग्रॅमिंग’ करण्याचं तंत्र या गटानं विकसित केलं आहे. या संशोधनाद्वारे पेशीतील घटकांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केल्यामुळे अनेक औषधं तसेच रासायनिक घटकांची निर्मिती प्रयोगशाळांतून तसेच औद्योगिक स्तरावर आता करता येईल.
केवळ जनुकीय घटकांवर नियंत्रण मिळविण्यावर हा संशोधन गट थांबला नसून पेशीतील डीएनए रेणूची आज्ञावली बदलण्याचं तंत्रही या गटाने विकसित केलं आहे. विशेषतः अनेक दुर्धर आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी डीएनए रेणूची आज्ञावली ‘कोड’ स्वरूपात विकसित करण्यात या गटाला यश मिळालं आहे. पेशीत रोगसंसर्ग झाल्यास तो टाळण्यासाठी लागणाऱ्या घटकांचा ‘कोड’ या पेशीत संक्रमित केला जाऊन त्याद्वारे कुठल्याही रोगावर मात करता येणं आता शक्य होणार आहे.
रोगांवर नियंत्रण मिळविण्याबरोबर या गटाने संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेशीच्या जनुकीय संरचनेत बदल घडवून विशिष्ट रोगावर लागणाऱ्या लसीची निर्मिती करण्यासाठी आवश्यक ‘कोड’ विकसित केले आहेत. पारंपरिक पद्धतीने अनेक दुर्धर रोगावर मात करण्यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधनासाठी मोठा कालावधी लागतो. पण या नवीन तंत्रज्ञानामुळे पेशींतील डीएनए रेणूच्या संरचनेत झटपट बदल घडवून रोगांवर मात करण्यासाठी मूलभूत तंत्र विकसित करण्यात पेंटॅगॉनमधील जीवशास्त्रीय संशोधन गटास यश आलं आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरास लागणाऱ्या चाचण्या होत असून प्रयोगशाळातून प्राण्यांवर करण्यात आलेल्या चाचण्या सफल झाल्या आहेत.
पेशीतील रसायनांची निर्मिती करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या तसेच डीएनए रेणूच्या संरचनेत बदल करून विकसित करण्यात आलेल्या ‘कोड’ तंत्रज्ञानाद्वारे मानवी जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून येणार असून त्यासाठी निर्माण केले जात आहेत ‘पेशींचे कारखाने’…

विश्वात दोन लाख कोटी आकाशगंगा

विश्वात दोन लाख कोटी आकाशगंगा


आकाशगंगा

विश्वात दोन लाख कोटी आकाशगंगा आहेत, असे एका अभ्यासाअंती दिसून आले आहे. सध्या फक्त दोनशे अब्ज आकाशगंगा असाव्यात, असे मानले जाते. आपल्याला दिसणाऱ्या विश्वात नेमक्या किती आकाशगंगा आहेत, ते शोधण्याचा प्रयत्न खगोलशास्त्रज्ञ गेली अनेक वर्षे करीत आहेत.
गेली वीस वर्षे खगोलशास्त्रज्ञ हबल दुर्बिणीतून मिळणाऱ्या प्रतिमांचा वापर करून आकाशगंगांची संख्या ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार आपल्याला दिसू शकणाऱ्या विश्वात १०० ते २०० अब्ज आकाशगंगा असाव्यात, असे आतापर्यंत मानले जाते.
सध्याच्या तंत्रज्ञानाद्वारे आपण फक्त दहा टक्के आकाशगंगांचाच अभ्यास करू शकतो. आणखी शक्तिशाली दुबिणी तयार झाल्यानंतरही उर्वरित ९० टक्के आकाशगंगा फक्त पाहता येणार आहेत, अशी माहिती नव्या अभ्यासात देण्यात आली आहे. ब्रिटनमधील नॉटिंगहम विद्यापीठातील क्रिस्टोफर कन्सेलिस यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला आहे.
याच विद्यापीठातील पीएचडी स्नातक अॅरन विल्किन्सन यांनी आकाशगंगांची प्राथमिक मोजदाद केली. एखाद्या विशिष्ट काळात विशिष्ट अवकाशात किती आकाशगंगा होत्या, याचे मापन केले असता पूर्वी मापन केलेल्या काळापेक्षा त्या अधिक असल्याचे जाणवले. या मापनासाठी कन्सेलिस आणि त्यांच्या पथकाने नेदरलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ लीडन आणि ब्रिटनमधील एडिंबरा विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत घेतली. विश्वाचे वय काही अब्ज वर्षे असताना विशिष्ट अवकाशात आजच्या काळातील तेवढ्याच अवकाशाच्या तुलनेत दहा पट अधिक आकाशगंगा होत्या, असे अभ्यासात दिसून आले.

कसा केला अभ्यास?

>कन्सेलिस यांच्या पथकाने जगभरातील विविध दुर्बिणींमधून टिपण्यात आलेल्या सुदूर अवकाशातील पेन्सिल बीम प्रतिमांचे, त्यातही प्रामुख्याने हबल दुर्बिणीतून टिपलेल्या प्रतिमांचे त्रिमितीय नकाशांमध्ये रूपांतर केले.
>त्यामुळे या आकाशगंगांची घनता निश्चित करणे आणि अवकाशातील दोन पोकळ्यांचा आकार निश्चित करणे शक्य झाले.
>या किचकट अभ्यासामुळे किती आकाशगंगा आपल्या ज्ञातापलीकडे आहेत याचे मापन करता आले.
>विविध काळी निरीक्षण करण्यात आलेल्या आकाशगंगांच्या नोंदींच्या आधारे हा अभ्यास करण्यात आला.

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल

जागतिक स्तरावरील स्मार्टफोन विक्रीत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपला आणखी एक नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे.
c9 pro
नवी दिल्ली- जागतिक स्तरावरील स्मार्टफोन विक्रीत अव्वल स्थानी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपला आणखी एक नवा स्मार्टफोन भारतीय बाजारात आणला आहे. ‘सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो’ असे या स्मार्टफोनचे नाव आहे. हा स्मार्टफोनची ऑनलाईन विक्री येत्या २७ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
‘सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो’ या स्मार्टफोनची किंमत ३६ हजार ९०० रुपये आहे. काळ्या आणि गोल्डन रंगामध्ये हा फोन उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनची प्री-बुकींग करणा-या ग्राहकांसाठी कंपनीने १२ महिन्यातून एकदा स्क्रिन बदलण्याची गॅरंटी दिली आहे. हा स्मार्टफोन येत्या फेब्रुवारीपासून रिटेल दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.
असा आहे ‘सॅमसंग गॅलॅक्सी सी ९ प्रो’
» ६ इंचाचा डिस्प्ले
» ६४ जीबी मेमरी
» १.४४ गिगाहर्टझ ऑक्टाकोर प्रोसेसर
» सहा जीबी रॅम
»१६ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा
»१६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
» अँड्रॉईड ६.० मार्शमॅलो
» वायफाय, एनएफसी, ब्लूटूथ,
» ४००० एमएएच बॅटरी
» किंमत -३६ हजार ९०० रुपये

Whatsapp वरील नविन नोटाबाबतचे वायरल मेसेज

हे वर्ष भारीच..
देवाने सगळंच ऐकलं...

..."येरे   येरे पावसा
    तुला देतो पैसा
    पाऊस आला मोठा
    पैसा झाला खोटा..."

😂😂😂😂😂😂

आज सकाळी कपडे धुवायला घातले खिशात 500 ची नोट होती....

बाइको ने परत आणून दिले....


डोळ्यात पाणी आला राव पहिल्यांदाच ईमानदारी पाहून

😂😂😂

माझ्या नोटा देतो पण मला सोडा
.
.
.

छगन😂😂😂

अब ये अफव़ा कौन फैला रहा है 




गांधी 👶🏻जी 

मोदी 👳जी के सपने मे आये थे 






और कहा😬 बहूत दिन से dp😎 change  नही की  Dp change कऱो मेरा..  😜😜😝😝😝😂

चौथीत गेलो.....syllabus change...!
दहावीत गेलो....syllabus change..!
Graduation....pattern change..!

पैसे कमवायला लागलो.....साला नोटाच् change...!!

नवीन २००० च्या नोटमध्ये:
GPS चीप असणार आहे,
सायरन असणार आहे,
एक कॅमेरा पण असणार आहे,
एवढंच नाही तर लाच घेतली तर गांधीजी स्वतः बाहेर येऊन मुस्काटात मारणार आहेत असं ऐकलंय. 😝😝

गब्बर : ये हाथ मुझे दे दे ठाकुर.....
.
.
.
.
.
.








ठाकुर : नाय र बाबा नोटा मोजायच्या  हाईत अजुन..  .💰💰💰💰💰💰 
😂😂😂😂😂


अखील भारतीय नोटा मोजा संघटना.🤓

खुलता कळी खुलेना 🌹













मोदी👳🏼 काय करेल काय कळेना....

--श्रीमंत लोक.

पुणे येथे नवीन धमकी😡😡

थांब तुझ्या अकाउंटला  5  लाख  भरतो😆😆😂😂

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हे उरात होतंय धडधड बॅक बंद आता झाली,
पोत्यात भरलं घबाड ही मोदीची बाधा झाली..
आता अधीर झालोया, मग बधीर झालोया...
ब्लॅक मनी व्हाईट कराया बॅकेत आलोया...
आरं बुडलोय लाखात, लोळतोय राखत... अंगात आलंया...
*झालं झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट..*

आता उतावीळ झालो, घबाड उकरून काढलं
तुझ्या नावावर काही रक्कम चक्कानं धाडीलं
 पोती भरून आलोया, लई दुरून आलोया...
फाडून गादी भारी नोटा घेऊन आलोया...
समद्या पोरात म्या लई घोरात..
अंगात आलया....
*झालं झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट..*

समद्या गावाला झालेया माझ्या अटकेची घाई..
कुणी घेणार हो माझ्या या नोटा थोड्या काही..
आता सर्जिकल आलंया...वाॅनटेड झालोया...
चौकीवरून पोलिसांना कलटी मारून आलोया...
*झालं झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट..*


🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯
2016 मध्ये बरच काही घडतंय
उगाच नाही लोकं बोलत...
.
.

"सोळावं" वरीस धोक्याचं..!!😜😂

🙏🏻
अशी वाट लावली आहे काही लोकांची मोदींनी..... की..,

सात पिढ्या बसुन खातील असे तोंड वर करुन बोलणारे .......

दुधाची पिशवी ऊधार मागत आहेत....!!!!!😎

-----------------------------------------------------


गूगल पेजवर पुण्यातील 11 वर्षीय अन्विताचे 'डूडल' झळकले

गूगल पेजवर पुण्यातील 11 वर्षीय अन्विताचे 'डूडल' झळकले


पुण्याच्या 11 वर्षीय अन्विता प्रशांत तेलंग हिने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून तिने तयार केलेले डूडल बालदिनानिमित्त सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी गूगलच्या होमपेजवर झळकले.
बालदिनाचे औचित्यसाधून गूगलच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ‘डूडल फॉर गूगल’ ही स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा पहिली ते तिसरी, तिसरी ते सहावी आणि सहावी ते दहावी अशा एकूण तीन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत पुण्याच्या बालेवाडीतील विबग्योर हायस्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनविताने नुकत्याच बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेसाठी ‘मला या देशाला काय शिकवायचे असेल, तर काय शिकवणार?’ असा प्रश्न दिला होता. या संकल्पनेवर आधारित आकर्षक ‘डूडल’ बनवून अन्विताने गूगलला पाठवले होते. तिचे हे डूडल आज गूगल इंडियाच्या होम पेजवर झळकले.
या स्पर्धेतील पहिल्या गटात विशाखापट्टणमच्या बी श्रिशा हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिने ‘घरातील बाग’ या विषयावरील ‘डूडल’ तयार केले होते. तर तिसऱ्या गटात रांचीच्या अक्षदीपने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असून, त्याने ‘पाणी वाचवा, भविष्य वाचवा’ या विषयावरील ‘डूडल’ तयार केले होते.
”डूडल फॉर गूगल’च्या माध्यमातून प्रत्येक वयोगटातील मुलांच्या क्रिएटिव्हीटी, पॅशन आणि इमॅजिनेशनला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अन्विताने विजय मिळवल्याने, तिचे मी अभिनंदन करते.” अशी गूगल इंडियाच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुखांनी दिली.
या स्पर्धेसाठी देशातील 50 शहरांमधून अनेकांनी सहभाग घेतला होता.